मशिदीत २३ जणांना लपवले, गुन्हा दाखल.

 


नगर - श्रीरामपूर वॉर्ड नंबर दोनमधील उमर फारूख मशिदीमधून पोलिसांनी गुरुवारी २३ नागरिकांना ताब्यात घेतले.


या सर्वांना होम क्वारंन्टाइन करण्यात आले आहे. या प्रकरणी तबलीक जमातीचे सचिव अब्दुल रेहमान मोहम्मद शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला.



उमर फारुक मशिदीमध्ये अमरावती, पुणे, वर्धा, तसेच उत्तरप्रदेशातील २३ नागरिक थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


गुरुवारी तपासणी केली असता हा प्रकार उघड झाला. तीन महिन्यांपूर्वी पारनेर येथे आयोजित केलेला इस्तेमा रद्द झाल्याने ते याठिकाणी आले होते.


तीन महिन्यांपासून उमर फारुख मशिदीत ते राहात होते. देशभरात लॉकडाउन जाहीर केल्याने ते येथेच अडकून पडले.


मशीद बंद न करता जमातीचे प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेरून आलेल्या २३ लोकांना लपवून ठेवले.


याप्रकरणी रमीजराजा रफिक आत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हाजी अब्दुल रेहमान मोहम्मद शेख यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.