नाशिक - करोनामुळे अवघ्या जगाला चिंतेने ग्रासले आहे. करोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे अफवांनी लोकांच्या मनात भीती पसरवली आहे.
अशा अफवा पसरणाऱ्यां विरोधात महाराष्ट्र सरकारने कडक भूमिका घेतलेली असताना एकाला टिक टॉक व्हिडीओ करण अंगलट आले आहे.
मालेगाव येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने टिक-टॉकवर करोना व्हायरसशी संबंधीत आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केला होता.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.
या व्यक्तीवर कलम १५३ आणि १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.